मंदिर बंद ,उघडले बार! उद्धवा अजब तुझे सरकार….धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने केले लाक्षणिक आंदोलन

khultabad-bjp

मंदिराचे बंद असलेले दरवाजे उघडावे याकरिता वेरुळ येथे महादेव मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – धार्मिक स्थळे व मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीकरिता भाजपा जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी लाक्षणिक उपोषण भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाभरात करण्यात आले.
गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडावे याकरता अनेक वेळा मागणी करूनही राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले तरीही महाराष्ट्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही उलट राज्याचे मंदिराचे दरवाजे बंद व दारूचे दुकाने बार उघडण्यात आले संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू केले आहेत आणि मंदिरे बंद आहे असे काळे चित्र उभे केले आहे या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रातील प्रमुख धर्माचार्य विविध संप्रदायाचे साधुसंत अनेक धार्मिक संघटना, भजनी मंडळ, अध्यात्मिक संघटना यांनी एकत्र येऊन अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या समन्वयातून राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण केले आहे.

 

 

 

 

या लाक्षणिक उपोषणास भारतीय जनता पार्टी ,जय बाबाजी अध्यात्मिक समन्वय आघाडी, जय बाबाजी भक्त परिवार,भजनी मंडळ मंदिर परिसरातील दुकानदार संघटना या सर्वांचा या लाक्षणिक उपोषणास पाठिंबा देण्यात आला.

 

 

 

 

या लाक्षणिक उपोषणास राज्य परिषदेचे भा.ज.पा चे खासदार डॉ. भागवत कराड, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुखदेव ठेंगडे, जिल्हा चिटणीस ज्ञानेश्वर नलावडे ,पंचायत समितीचे सभापती गणेश अधाने, उपसभापती प्रकाश चव्हाण, पंचायत समिती सदस्य युवराज ठेंगडे, अजीज मणियार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल निकुंभ, शहराध्यक्ष सतिश दांडेकर, तालुका सरचिटणीस गणेश हजारी ,अविनाश कुलकर्णी आशिष कुलकर्णी माजी उपसभापती दिनेश अंभोरे अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सत्तार पटेल, मुक्तार पटेल, सचिन जाधव, सागर मातकर ,विलास काळे कृष्णा चव्हाण ,कृष्णा हिवर्डी, बाळू नलावडे, महेंद्र अवाड, विजय राठोड, महेंद्रसिंग दगडफोडे, माजी सभापती भीमराव खंडागळे, अनिल करपे संजय करपे, जय बाबाजी परिवाराचे रामानंद महाराज, दामू अण्णा गवळी, निलेश हरणे, तसेच भजनी मंडळ ,संत मंडळी,परिसरातील दुकानदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here