खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – येथील तहसीलदार राहुल गायकवाड व गट विकास अधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे यांची बदली झाल्याने त्यांना खुलताबाद नगरपरिषदच्या वतीने सत्कार करण्यात आले.याप्रसंगी तहसीलदार राहुल गायकवाड तसेच गटविकासअधिकारी ज्ञानोबा मोकाटे. यांना नगरध्यक्ष अॅड.एस एम कमर यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. यावेळी. नगरसेवक परसराम बारगळ. शेख ईम्रान,तसेच नगरपरिषदेच्या कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या वतीने निरोप देण्यात आला.
तहसीलदार राहुल गायकवाड व गट विकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे यांची वैजापूर येथे बदली झाल्याने त्यांना तहसील कार्यालय व गट विकास अधिकारी कार्यालयातर्फे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते .
तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते यांच्या अध्यक्षस्थानी आयोजित कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सीताराम महेत्रे नायब तहसीलदार पी. बी. गवळी उदय मानवतकर , अशोक कापसे मंडळ अधिकारी विलास सोनवणे अव्वल कारकून राउत,एस डी सवई , आर , एन चंदेल शेख हरिदास पांढरे विनेश महेर , भारती कुलकर्णी कन्हयाकुमार वैष्णव तलाठी आप्पासाहेब सोनवणे सतीश भिंगारे देवराव गोरे आत्माराम महाजन लक्ष्मण जाधव कोतवाल संघटनेचे अध्यक्ष विलास वाहूळ अशोक गर्गे सचिव अनिल घोरपडे भारतबाई साबणे उपस्थित होते . पं.स. कार्यालयात सभापती गणेश अधाने , उपसभापती रेखा प्रकाश चव्हाण माजी सभापती दिनेश अंभोरे , जगन्नाथ खोसरे भीमराव खंडागळे युवराज ठेंगडे अविनाश कुलकर्णी सतीश दांडेकर आशिष कुलकर्णी कृष्णा चव्हाण दिनेश सावजी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.







