कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय महासचिव इश्तियाक जागीरदार यांनी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष फारुक शेख व शहर अध्यक्ष हाजी मतीन बागवान यांच्या शुभहस्ते जागिरदार याचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. इश्तियाक जहागीरदार यांनी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरात होत असलेल्या उत्कृष्ट कामाची माहिती जाणून घेतली.
आज समाजात प्रत्येक समाजाच्या उत्सवाला खांद्याला खांद्या लावून काम करणे, पुष्पगुच्छ देऊन त्याच्या स्वागत करणे खरोखरच छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे कार्य कौतुकास्पद असून, सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील कार्यास त्यांनी शुभेच्छा दिली..यावेळी ॲड.सैफन शेख, शेख रिजवान,उजेर,अयाज दिना,*वाहिद तांबोळी, जावीद बद्दी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.







