गिरीजा मध्यम प्रकल्पाची डाव्या उजव्या कालव्याची साफसफाई ; रब्बी पिक हंगाम बघता पाणी सोडण्याची तयारी 

girija-bandhara

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील येसगाव नं एक, येथील गिरिजा मध्यम प्रकल्प यंदा पाण्याने तुडूंब भरून असुण रब्बी पिक हंगाम बघता प्रकल्प सिंचन विभागाकडून दोन्ही डाव्या – उजव्या कालव्याची साफसफाई करून पाणी सोडण्याची तयारी चालवली आहे.

 

 

यंदा सरासरी पेक्षा दुप्पट तिप्पट पाऊस झाला असून प्रकल्प, धरण, तलाव, केटी, नदी, नाले, विहिरीपाण्याने तुडूंब भरून सद्या वाहत आहे. तर आवकाळी पावसाचा जोर ही कायम असल्याने शेतकरी नागरिक चिंतातूर झाले आहे. त्यात खरिप पिकांची पावसाने अक्षरशः वाट लावली आहे. परंतु यंदा रब्बी पिक हंगामाला संधी उपलब्ध झाली आहे. girija-prakalp

 

 

सर्वत्र पाणीचपाणी उपलब्ध असुण रब्बी पिक हंगामाची तयारी शेतकऱ्यांनीही चालवली आहे. खरिप नाही तर रब्बी पिकाची आशा शेतकऱ्यांना आहे. पाच सहा वर्षा नंतर समाधानकारक पाऊस होऊन रब्बी पिक हंगाम साठी पोषक वातावरण निर्माण झाला आहे. त्यात थंडी ऐवजी पावसाचीच हजेरी सुरु असल्याने बाजरी, मका, सोयाबीन रिकामे झालेले शेती ट्रॅक्टर द्वारे नांगरणी मोगडनी चे कामे शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे.

 

 

प्रकल्पा खालील शेती सिंचन साठी विभागाने डाव्या उजव्या कालव्याची साफसफाई सुरु केली आहे. कालव्यात ठिकठिकाणी मोठमोठी झाडी झुडपे वाढली होती तर माती दगडे सांडव्यात झाली होती पाणी सोडण्यापुर्वी त्याची साफसफाई सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here