अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीचा ‘आरपीआय’मध्ये प्रवेश

payal-ghosh-in-RPI

मुंबई (हितेश मिस्त्री) – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री पायल घोष यांनी नुकताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.

 

पायल घोष हिने अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारदेखील तिने दाखल केली होती. चौकशी न झाल्याने पायाल थेट राज्यपालांकडे गेली होती. या संपूर्ण प्रकारणामध्ये आरपीआयने पायलला पाठींबा दिला होता. दरम्यान, आता पायलने आरपीआयचा झेंडा घेत राजकारणात प्रवेश केला आहे.

 

राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पायलचा पक्षप्रवेश पार पडला. पायलसह अभिनेत्री कनिष्का सोनी, बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकूर चाफेकर यांनी आरपीआयमध्ये पक्षप्रवेश केल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here