रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – दि 28ओक्टोबर 2020रोजी मंगळवार बहुजन क्रांति मोर्चा ची तालुकास्तरीय बैठक घेण्यात आली मनोज पोहकर यांच्या अध्यक्षते खाली बैठक घेण्यात आली.
बैठकीमध्ये सूत्रसंचालन रावेर तालुका संयोजक साहेबराव वानखेडे यांनी केले व संघटनेचा विस्तार, कशा पद्धतीमध्ये करावा, साधन संसाधन निर्माण करावे, राष्ट्रीय आधिवेशनाचा प्रचार प्रसार कसा करावा, व इतर सर्व विषयांवर सखोल मार्गदर्शन केले व कार्यकारणी सन्दर्भात बहुजन क्रांति मोर्चाचे जिल्हा संयोजक मा. राजू खरे यांच्याशी कार्यकारणी निवड सन्दर्भात चर्चा करण्यात आली.
या बैठकीत सर्वानुमते लियाकत जमादार यांची बहुजन क्रांति मोर्चा तालुका उपाध्यक्ष,.रुपेश अटकाळे उर्फ़ बंटी भाऊ यांची रावेर शहर अध्यक्ष. तालुका सचिव विशाल भागेश्वर यांची निवड करण्यात आली सदर बैठकी मध्ये राजू भाऊ खिरवडकर इरफ़ान शेख संतोष इंगळे विजय डोळे सिताराम वानखेडे सतीश सपकाळे नजीर शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.







