गिरिजा व गंधेश्वर धरण तुडुंब भरले तरीही फुलंब्री व कन्नड तालुक्यातील शेतीसाठी पाणी नाही

girija-dharan

खुलताबाद ( प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्प व गंधेश्वर येथील गंधेश्वर प्रकल्प ही दोन्ही प्रकल्प खुलताबाद तालुक्यात आहे. व ते नागरिकांना फक्त पाणी पिण्यासाठी फायदाच ठरते तर शेती विषायीक फुलंब्री व कन्नड तालुक्यातील शेतकरी- नागरिकांना फायद्याचे ठरत असल्याने प्रकल्प तुडूंब भरून असले तरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुचकामी ठरत आहे.

 

 

खुलताबाद तालुक्यातील येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्प व गंधेश्वर येथील गंधेश्वर मध्यम प्रकल्प ही दोन्ही प्रकल्प शिवार तथा तालुका सिमेवर आहे. तर सिंचन साठी प्रकल्पा खाली ओलीत सिंचन साठी क्षेत्र नसल्याने खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन्ही प्रकल्पांच्या पाण्याचा फायदाच होत नाही. फक्त पिण्याच्या पाण्याचा फायदा होतो. शेती साठी फायदाच होत नाही.

 

दोन्ही प्रकल्पातील शेत जमीन खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची गेली आहे. फायदा मात्र फुलंब्री व कन्नड तालुक्याला झाला आहे.प्रकल्प होताना ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली नाही. परंतु आता प्रकल्पातील पाणी वापर तालुक्यातील शेतकऱ्यां ऐवजी दुसर्‍या तालुक्यातील शेतकऱ्यांना होत असल्याने शेतकरी मनाला लावून घेत आहे. व पश्चाताप करतांना दिसत आहे.

 

यंदा गिरिजा व गंधेश्वर दोन्ही प्रकल्प पाण्याने तुडूंब भरून आहे. ते पाणी खुलताबाद तालुक्यातील नागरिकांना फक्त पिण्यासाठीच वापरता येणार आहे. व शेती ओलीत तथा सिंचन साठी प्रकल्पा खालील म्हणजे फुलंब्री व कन्नड तालुक्याला याचा लाभ मिळणार आहे. यंदा रब्बी पिक हंगाम साठी दोन्ही प्रकल्प अतिशय पाण्यासाठी महत्त्वाचे ठरणार परंतु खुलताबाद नव्हे फुलंब्री व कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हे विशेष. खुलताबाद तालुक्यातील शेतकरी आता फक्त पश्चातापच करु शकतात. लाभ मात्र घेवू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here