शेतकऱ्यांनो घाबरून जाऊ नका, नुकसान भरपाई मिळणार – अशोक चव्हाण

ashok-chavan-at-khultabad

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नाही सरकार शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही भरीव मदत करू असे आश्वासन तालुक्याच्या दैवऱ्यावर दरम्यान दिले.

 

तालुक्यातील पळसवाडी येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान आलेल्या मालाची भरपाई दिली जाईल या साठी जिल्हाधिकारी यांना सरसकट पंचनामे करण्या संबंधी आदेश देणार असल्याचे सांगितले या वेळी जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष कल्याण काळे माजी आमदार नामदेवराव काळे ,सुभाष झांबड महाराष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष ,विलास औताडे जिल्हा बँकेचे संचालक श्री.किरण डोणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती

 

या वेळी परिसरातील अती पावसाने रस्ते वाहून गेले असल्याने दळण वळण करण्यास त्रास होत आहे आहेत शेती माल घरी नेता येत नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे. शेत पिकाची नुकसान भरपाई व रस्ते दुरुस्त करण्या संबंधी निवेदन देण्यात आले पळसवाडी येथील वि.सो चेअरमन गुलाब ठेंगडे,माजी सरपंच सोमिनाथ ठेंगडे,शिवसेनेचे सुधाकर दहिवाल,अनिल औटे,दलपत राठोड, संजय ठेंगडे, देविदास म्हसरूप,शे. मुक्तार शेठ,विठ्ठल काळे,रंगनाथ काळे, रमेश ठेंगडे, प्रकाश म्हसरूप, शब्बीर शहा, साहेब खान पठाण, कैलास गिरे, सुदाम देवरे, बाबुराव औटे, विजय वाकळे,नारायण म्हसरूप,राजू देवरे, सुनील गायकवाड,नाना गायकवाड, जनार्धन औटे,रतन औटे, संतोष म्हसरूप,कृष्णा राठोड,लक्ष्मण औटे, देविदास काळे,ज्ञानेश्वर औटे,नारायण ठेंगडे,योगेश ठेंगडे,सचिन ठेंगडे,यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here