स्पंदन आर्टस् संस्थेच्यावतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याहस्ते कोविड वाॅरिअर्स प्रमाणपत्र देऊन अभिनेते प्रशांत दामले यांचा सन्मान

prashant-damale

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – स्पंदन आर्ट्स या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल मा.भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि आता कोरोना काळात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून , समाजभान राखून सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कोविड वॉरिअर्स प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

 

 

यावेळी नाट्य चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोविड वाॅरिअर्स प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते मा.आमदार अॅड.आशिष शेलार उपस्थित होते. मराठी नाट्य चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना, रंगकर्मीनां अभिमानाची गोष्ट म्हणजे अभिनेते प्रशांत दामले यांना कोविड वाॅरिअर्स प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

 

अभिनेते प्रशांत दामले यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउनच्या काळात मोठ्या कठीण संकटात मराठी नाटक समूहाच्या माध्यमातून पडद्यामागील कलाकारांना एक हात मदतीचा दिला होता. स्पंदन संस्थेच्या वतीने प्रशांत दामले यांच्या या मोठ्या कर्तृत्वाची विशेष दखल घेऊन त्यांना कोविड वाॅरिअर्स प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.मराठी नाटक समूहासाठी ही खूपच अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.

 

नाट्य चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी , रंगकर्मींनी अभिनेते प्रशांत दामले यांना अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या आहेत. आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. अशी माहिती आशीर्वाद मराठे यांनी दिली.

prashant-damale

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here