ठाणे येथे भाजपातर्फे आज सकाळी ज्यूस वाटपाचा कार्यक्रम

bjp-thane

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – आज दि. ८ नोव्हेंबर २०२० – भारतीय जनता पार्टी, ठाणे अध्यक्ष, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर व सचिव, भाजप, महाराष्ट्र प्रदेश संदिप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली येऊर येथे सकाळी १०:३० वाजता दिवाळी निमित्त ज्यूस वाटपाचा कार्यक्रम प्रायोजक THE INSTITUTE OF CHARTERED ACCOUNTANTS OF INDIA ठाणे शाखा यांच्या सहकार्याने आयोजित केला असून काही कार्यकर्त्यांचा सम्मान देखील महाराष्ट्र पोलिस बॉईज असोसिएशनतर्फे करण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमास आमदार निरंजन डावखरे, अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, ठाणे, आमदार संजय केळकर, संदिप लेले, सचिव, भाजप, महाराष्ट्र प्रदेश, नगरसेवक, ठाणे महानगर पालिका, ठाणे, विलास साठे, सरचिटणिस, भाजप, ठाणे, कैलास म्हात्रे, सरचिटणिस, भाजप, ठाणे, मनोहर सुगदरे, सरचिटणिस, भाजप, ठाणे, वीरसिंग पारचा,अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा, भाजप, ठाणे, शिवभगवान आसावा, उपाध्यक्ष, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउन्टंटस् ऑफ इंडिया, ठाणे, सतिश बनसोडे, अध्यक्ष, महाराष्ट्र पोलिस बाॅईज असोसिएशन, ठाणे, विष्णूभैया खोडवेकर, अध्यक्ष, उत्कर्ष फाऊंडेशन ठाणे, अजय देशमुख, सचिव, उत्कर्ष फाऊंडेशन ठाणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

सर्व भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सुरक्षित अंतर ठेवत मास्कचा वापर करून या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी ठाणे यांच्यातर्फे संयोजक संजय गोंदवलेकर, उपाध्यक्ष, अनु. जाती. मोर्चा भारतीय जनता पार्टी, ठाणे, सुभाष साबळे चिटणीस भारतीय जनता पार्टी, ठाणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here