‘त्याने’ जेलमध्ये राहून घेतल्या चक्क ३१ पदव्या

prisoner-with-book

अहमदाबाद – आरोपी जेलमध्ये गेल्यानंतर अनेकदा आयुष्यात निराशा येते. कधी कधी ते अधिक धोकादायक बनतात. परंतु, खूप कमी कैदी जेलमध्ये गेल्यानंतर आपले भविष्य पुन्हा बनवतात. गुजरातमधील भावनगर येथे अशीच एक घटना घटली आहे. येथे राहणारे भानूभाई पटेल यांना फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट (FERA) कायद्याच्या उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली १० वर्षांची शिक्षा झाली. परंतु, जेलमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांनी ३१ पदव्या मिळवल्या. इतकेच नाही तर जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांना सरकारी नोकरीही मिळाली.

 

 

नोकरी मिळाल्यानंतर ५ वर्षात त्यांनी आणखी २३ पदव्या घेतल्या. त्यामुळे भानूभाई पटेल यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिव्हर्सल रेकार्ड फोरम आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये दाखल झाले आहे.
५९ वर्षांचे भानूभाई पटेल मूळचे भावनगरच्या महुवा येथील राहणारे आहेत. अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर १९९२ मध्ये मेडिकलची डिग्री घेण्यासाठी अमेरिकेत गेले होते. येथे त्यांचा एक मित्र स्टुडेंट व्हिसावर अमेरिकेत जॉब करत होता. तो आपला पगार भानूभाई यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करायचा. त्यामुळे भानूभाई पटेलांवर फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट (FERA) कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप झाला. या आरोपाखाली त्यांना १० वर्षांची शिक्षा झाली. ही शिक्षा त्यांना अहमदाबादमध्ये भोगावी लागली.

 

 

सामान्यत: जेल जाणाऱ्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नाही. परंतु, भानूभाईं जेलमधून सुटल्यानंतर आंबेडकर युनिव्हर्सिटीमधून जॉब ऑफर झाली. नोकरीनंतर ५ वर्षांत त्यांनी आणखी २३ पदव्या घेतल्या. आतापर्यंत त्यांनी ५४ पदव्या घेतल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here