आमदार व माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आज जोगेश्वरीतील इच्छापूर्ती
श्री गणेश मंदिरामध्ये गणरायाची यथोचित पूजाअर्चा करून घेतले श्रींचे दर्शन
मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे आज दिवाळी पाडवाच्या दिवसापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी उघडण्यात आली. या पार्श्वभूमीवर जोगेश्वरीतील श्यामनगर येथील दत्ताराम गोविंद वायकर ट्रस्ट संचालित हे गणपती मंदिरही उघडण्यात आले.
सर्व नियमांचे पालन करून, तोंडावर मुखपट्टी लावून भाविकांनी सोशल डिस्टन्स (वैयक्तिक अंतर) ठेऊन गणरायाचे दर्शन घेण्यासाठी प्रारंभ केला. सर्व भक्त – भाविकांसाठी खुले झालेल्या मंदिरामुळे पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले असे वाटू लागल्याचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या काही भाविकांनी सांगून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आभार मानले.
आमदार रविंद्र वायकर यांनी भाविकांना दिवाळी पाडवा व भाऊबीजेच्या निमित्ताने सर्वांना नवीन वर्ष आनंदाचे सुख समृद्धीचे जावो अश्या शुभेच्छा देत असताना देव करो व हे कोरोनाचे संकट लवकरच संपून जाऊन जनजीवन पुन्हा सुरळीत होवो ! अशी प्रार्थनाही केली, अशी माहिती जोगेश्वरी पूर्वेकडील समाज सेवक गणेश हिरवे यांनी दिली.







