नवी मुंबईतील कोविड टेस्टिंग घोटाळाप्रकरणी सरकारची कारवाई; एक अधिकारी निलंबित

covid-center-navimumbai

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नवी मुंबई: नवी मुंबईतील कोविड टेस्टिंग सेंटरमधील घोटाळाप्रकरणी सरकारकडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडून शुक्रवारी याप्रकरणी एका मनपा अधिकाऱ्याला निलंबित केले.

 

 

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गुरुवारी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेत याप्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर डॉ. योगेश कडूसकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती.

 

या समितीने चौकशीअंती मनपाचे आरोग्य अधिकारी आणि टेस्टिंग इनचार्ज डॉ. सचिन नेमाने यांना निलंबित केले. तसेच दोन आठवड्यात याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांकडून सांगण्यात आले.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here