सुरेल लोकप्रिय सुमधुर हिंदी चित्रपट युगुल गीतांची ” क्या यही प्यार है ” संगीत मैफल संपन्न

kya-yahi-pyar-hai

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याच अनुषंगानेच निर्माता दिग्दर्शक मिलिंद खातू यांच्या एम एम म्युझिक प्रेझेंटस् ” क्या यही प्यार है ” या लोकप्रिय सुरेल हिंदी चित्रपट युगुल गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती.

 

या शो मध्ये निर्माता मिलिंद खातू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ( एव्हरग्रीन डुएट्स ऑफ बाॅलिवूड ) सुमधुर, सुरेल , अविस्मरणीय लोकप्रिय युगुल गीतांची ” क्या यही प्यार है ” ही सुरेल संगीत मैफल डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आॅनलाईन सादर करण्यात आली.निर्माता मिलिंद खातू यांच्या एम एम म्युझिक प्रेझेंटस् तर्फे सादर केलेल्या अविस्मरणीय सुमधुर लोकप्रिय गाजलेल्या युगुल गीतांच्या ” क्या यही प्यार है ”

 

या आॅनलाईन कार्यक्रमात अमित राजे, आणि सीमा चक्रवर्ती या गायकांनी गाजलेली मधुर युगुल गीते सादर केली.या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन रेणू सोनाली पाठक ( RJ ) यांनी केले. या यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः भारतासह कॅनडा , मास्को , यूएसए , यूएई , यूके , ऑस्ट्रेलिया , बेल्जियम अशा जगभरातील हिंदी चित्रपट गीतांच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच असंख्य रसिकांनी इव्हेंट आॅर्गनाईझर मिलिंद खातू यांच्या यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला .

 

या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर मिलिंद खातू यांनी एम एम म्युझिक तर्फे डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन सुरेल हिंदी गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल , मधुर हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा देण्यासाठी एम एम म्युझिक सदैव प्रयत्नशील राहील असे मनोगत व्यक्त केले .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here