उपग्रह बनवायचा आहे, मग डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनला संपर्क करा

apj-kalam

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, हाऊस ऑफ कलाम, रामेश्वरम हि संस्था कलाम व्हिजन २०२० साठी भारतभर कार्यरत आहे. आमची संस्था कलाम कुटुंबियांकडून चालविली जाते. कलाम सर यांचे स्वप्नातील सशक्त आणि बलवान भारत बनविण्यासाठी भविष्यातील जबाबदार नागरिक बनविण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहोत.

 

याबाबत बुलंद पोलिस टाइम्सशी बोलताना डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी म्हणाले की, स्पेस झोन इंडिया यांचे सहकार्याने विद्यार्थ्याकडून प्रत्यक्ष १०० उपग्रह बनवून घेणार आहोत . हे उपग्रह हेलियम बलून वापरून अंतराळात प्रक्षेपित करणार आहोत. विद्यार्थ्यांना त्यांनी बनविलेला उपग्रह पृथ्वी वर बनविलेल्या केंद्राशी कसा संपर्क करतोय हे प्रत्यक्ष ऑनलाईन बघता येईल . अश्या प्रकारचा उपक्रम जगात प्रथमच होत असल्याने याची नोंद जागतिक विक्रम, आशिया विक्रम आणि भारतीय विक्रमासाठी करण्यात येईल. प्रक्षेपणाची वेळी वरील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहतील. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास जागतिक विक्रम, आशिया विक्रम आणि भारतीय विक्रम असे ३ प्रशस्ती पत्र देण्यात येईल.

 

 

इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी या प्रकल्पासाठी सहभाग घेण्यास पात्र असतील. काही नैपुण्य धारक विद्यार्थ्यांसाठी अहर्ता शिथिल करण्यात येईल . या उपक्रमात विद्यार्थी उपग्रह स्वतः बनवतील . त्या संबधी चा तपशील खालील प्रमाणे . १० विदयार्थ्यांचे एका समूहास एक उपग्रह देण्यात येईल . नाव नोंदणी ची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०२०, ऑनलाईन प्रशिक्षण – २ जानेवारी ते ७ जानेवारी, उपग्रह बांधणी – १८ जानेवरी ते २२ जानेवारी ( १ दिवसीय कार्यशाळा चेन्नई येथे स्वखर्चाने ), उपग्रहाचे प्रक्षेपण – ७ फेब्रुवारी २०२० रामेश्वरम , तामिळनाडू ( विद्यार्थी घरूनच ऑनलाईन प्रक्षेपण बघतील ), उपक्रमाची नोंदणी फी – १०,०००/- ( दहा हजार मात्र) यात चेन्नई येथील जाणे येणे आणि इतर खर्च समाविष्ट नाही.

 

 

संपूर्ण भारतातून विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य, १०० उपग्रहांची नाव नोंदणी झाल्यानंतर सोबत ची लिंक बंद करण्यात येईल, चेन्नई येथे जाण्या येण्या साठी ग्रुप बुकिंग साठी सहकार्य, एकदा नाव नोंदणी केल्यानंतर कुठल्याही परिस्थिती रद्द करण्यात येणार नाही, १०० विद्यार्थ्यांची नोंदणी महाराष्ट्रातून झाल्यास उपग्रह बांधणी ची १ दिवसीय कार्यशाळा पुणे किंवा मुंबई येथे घेतली जाईल या मुले चेन्नई येथे जाण्याचा त्रास आणि खर्च वाचेल, या उपक्रमाची माहिती आमच्या अधिकृत संकेत स्थळावर आपणास बघता येईल, खास महाराष्ट्रातील मुलासाठी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मराठी मधून मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक प्रमुख मार्गदर्शक सोबत असतील.

 

अधिक माहिती साठी मनीषा ताई चौधरी ( ८३२९७०७०४२) नाशिक, डॉ ज्योती महाजन ( ९४२३४९०८८६ ) जळगाव, श्री साहू संभाजी भारती (९९७५७३८३२१ ) पालघर, श्री श्रीरंग औचर्मल ( ९८२३०२८४९४ ) औरंगाबाद, श्री दामोदर डहाळे ( ९६५७६७९९९७) तुमसर यांच्याशी संपर्क करावा. नाव नोंदणी साठी खालील लिंक वर फॉर्म भरावा ( ट्रान्सिकशन ID सह )

http://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc56D9edgf1oseNClWQhLILuYIaUXutYX6ZdkFX1832l7X0Q/viewform 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here