बीड (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना गाव तिथे शाखा आज 101 व्या शाखेचे चिंचोटी येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मा.महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल अर्जुनराव दूबाले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, लॉक डाउन नंतर 101 वी शाखा वडवणी तालुक्यात चिंचोटी येथे शुभारंभ केला पोलिसांप्रति असलेली भावना व युवकांना राजकारण विरहित एक संघटना स्थापन करण्याचा उद्देश गावकर्यांच्या उत्साहात दिसला गावकऱ्यांनी वाजत गाजत संघटने स्वागत केले युवक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते शाखा शुभारंभ अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात झेंड्याचं अनावरण केलं व त्यांना शब्द दिला तुम्ही पोलिसांच्या पाठीशी उभे राहा मी तुमच्या पाठीशी उभा राहतो तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवेल गाव कर्यांनी शब्द दिला शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेसोबत राहू .







