वेरूळ लेणी परिसरातील 70 व्यवसायिकांच्या आर.टी.पी.सी.आर टेस्ट

RTPCR-Test

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ येथील कैलास लेणी पर्यटकांसाठी खुली झाल्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ सुरु झाली असून कुठल्याही प्रकारे कोणता प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून लेणी परिसरात असलेल्या सर्व प्रकारच्या व्यवसायिकांची शुक्रवारी जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली आर. टी.पी.सी.आर पद्धतीने कोरोना चाचणी करण्यात आली.

Verul-Corona-Test

 

या वेळी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लेणी परिसरात असलेली एलोरा केवस शॉप किपर अँड हॉटेल ओनारस असोसिएशन यांचे सहकार्याने तपासणी कॅम्प घेण्यात आला यात परिसरातील हॉटेल चालक,गाईड,सिक्योरिटी , हॉकर्स, चौकीदार, लेबार आदी अश्या 70 लोकांची करण्यात आली आर.टी.पी. सी.आर टेस्ट करण्यात आली.

 

 

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बलराज पा़ंडवे, गोपालकृष्ण गरीकी पाटील, मकरंद आपटे, व श्री क्षीरसागर, श्री के. एफ राठोड, प्रीती बनसोडे, सुधाकर बोडखे, के यस.झाटे, रविंद्र खंडागळे , श्री भास्कर एस जी., शेख कादिर, वाघ एस.पी. आदींची उपस्थिती होती.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here