मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – नाताळच्या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाने मुंबई सेंट्रल ते पणजी बससेवा नुकतीच सुरू केली आहे. मुंबईतील प्रवाशांना गोव्याकडे जाण्यासाठी ही एस टी बससेवा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
या एस टी बस मध्ये आसन आणि शयन सीटची व्यवस्था आहे. प्रवाशांनी आधीच बुकिंग केल्यास त्यांना आरक्षित सीट मिळेल. मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी ४.३० वाजता ही बस सुटेल आणि चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, म्हापसा मार्गे पणजीला जाईल. पणजी येथून ही बस संध्याकाळी ४ वाजता सुटेल.तसेच ही बस आगाऊ आरक्षणासाठी एस टी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तिकीट दर :- मुंबई सेंट्रल – पणजी रूपये ९६५/- , मुंबई सेंट्रल – म्हापसा रूपये ९५०/- , मुंबई सेंट्रल – बांदा रूपये ८९५/- , मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रूपये ८७५/- , मुंबई सेंट्रल – कणकवली रूपये ७८५/- असून, या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळाने केले आहे.







