नवी दिल्ली – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना करोना संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे.
करोनाची लक्षणं दिसत असल्याने मी करोनाची चाचणी केली. त्यानंतर माझा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे. माझं हे आवाहन आहे की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी. असं आवाहन जे. पी. नड्डा यांनी केलं आहे.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है, डॉक्टर्स की सलाह पर होम आइसोलेशन में सभी दिशा- निर्देशो का पालन कर रहा हूँ। मेरा अनुरोध है, जो भी लोग गत कुछ दिनों में संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) December 13, 2020
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या जे. पी. नड्डा यांची निवड गेल्या वर्षीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झाली. उत्तर प्रदेशात भाजपाला मिळालेल्या विजयात जे. पी. नड्डा यांचं मोठं योगदान आहे. १९८६ पासून जे. पी. नड्डा राजकारणात सक्रिय आहेत. दरम्यान जे. पी. नड्डा यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. तसंच जे कुणी माझ्या संपर्कात आलं आहे त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं आहे.







