मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि जानकीचा शुभविवाह

shree-ram-janki

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि जानकीचा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीच्या दिवशी विवाह झाला. म्हणून उत्तरेत विवाह पंचमी म्हणतात.ह्या मूर्ती अयोध्येतील काळेराम मंदिरातील आहेत.ह्या मूर्ती सध्या जिथे राम मंदीर उभारणीचं काम सुरू आहे , त्या जागी सम्राट विक्रमादित्य राजाने अयोध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी स्थापन केल्या. अखंड शाळीग्राम शिळेतील ह्या मूर्ती श्रीराम सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न अश्या पंचायतन स्वरूपात आहे.

मूर्तीच्या पायांशी श्रीयंत्र कोरलेलं आहे.विध्वंसक बाबराने हे मंदिर उध्वस्त केले होते. त्यावेळी ह्या मूर्ती शरयू नदीत ठेवण्यात आल्या होत्या.अनेक वर्षांनी महाराष्ट्रातल्या श्री.मोघे नावाच्या एका साधकाला दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी ह्या मूर्ती अयोध्येत शरयू तीरावर नागेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला स्थापन केल्या. अशी माहिती आजही ह्या मंदिराची व्यवस्था पहाणारे श्री.राघवेंद्र देशपांडे आणि कुटुंबीय देतात.

अयोध्येत महाराष्ट्रीय आचार विचार असलेली गोडसे आणि देशपांडे ही दोनच कुटूंब पहायला मिळतात. अयोध्येतील मंदिरात चैत्रात नारदीय कीर्तन आणि जन्मोत्सव महाराष्ट्रीयन पध्दतीने होतात. विशेषतः अयोध्येत होळी खेळे रघूवीरा म्हणजे अयोध्येतल्या लोकांची होळी साजरी करण्याची पद्धत वेगळी आहे.

महाराष्ट्रात अमांत पद्धतीने कार्तिक वद्य पंचमी असते तर उत्तरेत पौर्णिमांत पद्धतीने मार्गशीर्ष शुद्ध पंचमी असते. तो पंचांग विषय आहे.उत्तरेत या मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला विवाह पंचमी म्हणतात. अयोध्येतील काळेराम मंदिरात विवाह पंचमीला श्रीराम सीतेच्या मुंडावळ्या लावून नटलेल्या मूर्ती पहायला मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here