मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – कारोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन मध्ये संचारबंदी मध्ये सर्व धर्मियांचे सण घरातूनच साजरे करण्यात आले. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात येऊन सर्व व्यवहार शासकीय नियम पाळून सुरळीत होत आहेत. भाविकांच्या मर्यादित संख्येने धार्मिक स्थळे दर्शनाला खुली झाली आहेत.
31 डिसेंबर च्या रात्री नवं वर्षाचे स्वागत करण्यासाठी ( रात्रीची संचारबंदी ) नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे. तरी नवं वर्षाच्या 1 जानेवारी 2021 ला शुक्रवार शुभ दिवस असून नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती , शिर्डीचे साईबाबा , महालक्ष्मी देवीचे लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेऊन नवं वर्षाच्या कार्याची देव दर्शनाने शुभारंभ करीत असतात.
त्यामुळे नव वर्षाच्या स्वागता निमित्त देव देवतांचे दर्शन घेण्याकरीता काही प्रमाणात मंदिर मध्ये ज्यादा भाविकांना (शासकीय नियम पाळून) दर्शनाचा लाभ / प्रवेश मिळण्यासाठी शासनाने सवलत द्यावी अशी मागणी लोअर परळ मुंबई येथील साईभक्त विजय कदम यांनी केली आहे.







