राहुल अशोकलालजी कुंकूलोळ परिवारतर्फे प्रसन्नदाता ट्रस्टला कार्डियाक अँब्युलन्स भेट

ambulance-donate

सोलापूर (प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – दत्त जयंती निमित्त श्री.राहुल अशोकलालजी कुंकूलोळ परिवार बार्शी.तर्फे प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टला कार्डियाक अँब्युलन्स भेट देण्यात आली.

युवा उद्योजक राहुल कुंकूलोळ हे युवा उद्योजक समाजसेवेत सतत अग्रस्थानी असतात बार्शी शहरातील श्री.प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्ट कडून लवकरच या अँब्युलन्स चा वापर बार्शी व बार्शी तालुक्यातील रुग्णसेवे साठी केला जाणार आहे ही रुग्ण वाहिका सर्व सोयीनी उपलब्ध असणारी कार्डियाक रुग्णवाहिका आहे. लवकरच ही रुग्ण वाहिका प्रसन्नदाता ट्रस्टच्या माध्यमातून बार्शीकरांच्या सेवेत येत आहे.

प्रसन्नदाता ट्रस्ट. बार्शी ही मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा दृष्टिकोन समोर ठेऊन कार्य करणारी समाजसेवि संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून वैकुंठभुमि (स्मशानभूमी)सुशोभीकरण वैकुंठरथ,अन्नदान या सारख्ये स्तुत्य उपक्रम राबवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here