राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

mla-dilip-bankar-son-marriage

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. या लग्नसोहळ्यात महाविकास आघाडीतील मंत्रीदेखील उपस्थित असल्यानं या लग्नाची चांगलीच चर्चा होतेय. तर, भाजपनं या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी विवाह सोहळे व कार्यक्रमांवर सरकारने निर्बंध लावले आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये संख्या मर्यादित असावी, असे आदेशही सरकारनं दिले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमातच सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडत असताना आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. राष्ट्रवादीचे आमदार बनकर यांच्या मुलाच्या लग्नातही असाच काहीसा प्रकार घडला आहे.

या लग्न सोहळ्यात सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष, म्हणजे या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही उपस्थिती होती. त्यामुळं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here