महाराष्ट्रात नव्या कोरोनाची एन्ट्री

rajesh-tope

ब्रिटनहून आलेल्या 8 प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – महाराष्ट्रात नव्या कोरोनाची एन्ट्री झाली आहे. ब्रिटनहून आलेल्या 8 प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात मुंबईतील 5 जणांचा आणि पुणे, ठाणे, मिराभाईंदरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज ‘वर्षा’ येथे कोरोना लसीकरणाबाबत बैठक घेतली. तसेच ब्रिटनहून आलेल्या 8 प्रवाशांना नव्या विषाणूची लागण झालेली आहे, त्याबाबत आरोग्य विभाग व मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली व अधिक दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

नव्या कोरोना विषाणूची लागण झालेले 8 प्रवाशी सध्या संस्थात्मक विलगिकरणात असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यांचा संपर्क कुणाकुणाशी आला ते काटेकोरपणे शोधण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी बैठकीत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here