बर्ड फ्ल्यूची एंन्ट्री : हरियाणामध्येही दोन लाख कोंबड्यांची होणार कत्तल

bird-flu-in-hariyana

चंदीगढ – गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये बर्ड-फ्लूचा प्रसार झालेला पहायला मिळत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश अशा राज्यांमध्ये आतापर्यंत हजारो पक्षांचा यामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर आता हरियाणामध्येही हा बर्ड फ्लू पोहोचला असल्याचे समोर आले आहे.

हरियाणाच्या पंचकुलामध्ये काही दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मरुन पडलेल्या आढळल्या होत्या. यानंतर या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठवण्यात आले होते. या तीन नमुन्यांपैकी दोन नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून अलर्ट घोषित केला आहे. पंचकुलाच्या ज्या परिसरात मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या, त्याच्या एक किलोमीटर परिघात पाच पोल्ट्री फार्म आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या पाचही पोल्ट्री फार्मवरील एक लाख ६६ हजार २२८ कोंबड्यांना ठार करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी २५ डिसेंबरच्या आसपास राजस्थानमध्ये हा फ्लू पहिल्यांदा दिसून आला. त्यानंतर मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ, गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्येही हा बर्ड-फ्लू पसरला आहे. एव्हियन इन्फ्लूएन्झा या विषाणूच्या एच५एन८ या स्ट्रेनमुळे हा फ्लू होत आहे. सध्या माणसांमध्ये याचा कोणताही परिणाम दिसून आला नसला, तरी खबरदारी म्हणून या सर्व ठिकाणी अंडी आणि मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here