बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीराची बिकिनी घालून पोज

meera-kapoor

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. तिचं सुंदर दिसण्याबरोबरचं फॅशन सेंसदेखील अफलातूनच आहे. मीरा सोशल मीडियावरदेखील खूप ॲक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती आपले फोटोज शेअर करत असते. मीरा राजपूतचे फॅन फॉलोइंगदेखील कोणत्याही स्टारपेक्षा कमी नाही. इतकचं नाही तर शाहिद कपूर-मीरा राजपूत बॉलिवूड इंडस्ट्रीतील फेव्हरेट कपल्सपैकी एक आहे.

शाहिद कपूर सध्या मीरासोबत गोव्यात आहे. मीराने आपल्या इन्स्टाग्रामवर वेकेशनचे काही फोटोज शेअर केले आहेत. फोटोमध्ये मीरा एका रुममध्ये आरशासमोर बिकिनी घालून पोज देताना दिसते. अर्थातचं हा फोटो शाहिदने क्लिक केला आहे. या वेकेशनवर शाहिद आणि मीरा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन गेलेले नाहीत. फोटो शेअर करताना मीराने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘जेव्हा तो मला पाहतो.’ मीराच्या कॅप्शनमुळे हा फोटो अधिक व्हायरल होत आहे.

शाहिद कपूर त्याचा आगामी चित्रपट जर्सीमध्ये बिझी होता. शूटिंग शेड्यूल आणि कोरोनानंतर आता तो काही वेळ मीरासोबत घालवत आहे. शाहिद लवकरचं जर्सी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या औचित्याने रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here