मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (23 जानेवारी) कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आज त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. बाळासाहेब ठाकरे यांचा हा ब्राँझ पुतळा श्यामाप्रसाद चौकात बसवण्यात आलाय.







