जळगांव (संपादक सुनिल पाटील) – येथील युवा सेनेतर्फे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शहरातील समस्यांविषयी सर्व्हेक्षण करून माहिती गोळा गेली जात आहे. हि माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोचवली जाणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शनिवारी २३ जानेवारी रोजी जयंती असते. पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे आदेशाने व युवासेना विस्तारक कुणाल दराडे व किशोर भोंसले यांचे मार्गदर्शानाख़ाली, युवा सेनेचे उपजिल्हा युवाधिकारी पियुष गांधी यांच्या नेतृत्वात हा उपक्रम घेतला जात आहे. या सर्व्हेक्षण उपक्रमात शहरातील रोजगार, शिक्षण, रस्ते-वीज-पाणी या मूलभूत समस्या, उद्योग, आरोग्य, महिला सुरक्षितता, सामाजिक प्रश्न आदी विषयांवर मत प्रदर्शित केली जात आहे. या सर्व्हेक्षणात आतापर्यंत ४२५ नागरिकांनी सहभाग घेतला असून नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

सर्व्हेक्षण नेहरू चौक, कोर्ट चौक, नवीपेठ, रिंगरोड, जुने जळगाव, महाबळ, एम.जे. कॉलेज परिसर, मेहरूण, पिंप्राळा, खोटे नगर आदी भागात करण्यात येत आहे. सर्व्हेक्षणात गिरीश पाटिल,रोहित शिरसाठ,ललित अमोदकर,चेतन चौधरी आदी युवासैनिकांनी सहभाग नोंदवला आहे.







