सह्याद्री मंडळातर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सह्याद्री-चषक-स्पर्धा

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – सहयाद्री सेवाभावी संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वीर सावरकर क्रीडांगण गोरेगाव पूर्व, जयकोच येथे दि 7 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आली असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे मराठी सिने अभिनेते व लोकप्रतिनिधी यांच्या शुभहस्ते विजयी संघांना रोख पारितोषिक व शिल्ड देण्यात येईल.

कोरोना लॉकडाउनच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता विभागात व अन्य ठिकाणी कोविड योद्धा म्हणून ज्यांनी सेवा बजावली अशा अजित भोगले,अमर मालवणकर,विशाल येरागी,गणेश हिरवे सर,अश्विनी सारफरे, सूर्यकांत सालम,उज्वला नेमण,समीक्षा माळी, परेश मोरे, प्रसाद कदम,संदीप कसालकर, आदी सामाजिक कार्यकर्त्यांचा कोविडरत्न पुरस्कार म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

विभागातील ज्या तरुणांनी विविध खेळांमध्ये नैपुण्य संपादन केले आहे अशांना खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची व सदर कार्यक्रम आयोजन करण्यासाठी विशाल येरागी, चेतन सारफरे, मयुरेश कोलथरकर, विजय निकम, प्रशांत पालांडे, नवनाथ दळवी,चंद्रकांत परब आदी मान्यवरांनी पुढाकार घेतल्याची माहिती सह्याद्रीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here