सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवणजी) – पोलीस जाणीव सेवा संघा तर्फे बार्शी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले वाणी पाँल्ट येथील अंगणवाडी मधील लहान मुलांच्या भवितव्यासाठी अंगणवाडी मध्ये प्रवेश मिळावा व त्यांच्या शालेय पोषण आहाराची व्यवस्था करण्यात यावी म्हणून हे निवेदन देण्यात आले.
यावेळी बार्शी तालुका विभाग प्रमुख उमेश आणेराव ,बार्शी तालुका अध्यक्ष राहुल वाणी, सुनील नवले, मानकोजी ,ताकभाते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.







