मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – राज्य राखीव दलाची बदली १५ वर्षे वरुन १० वर्षे असावी अशी मागणी करत समाजसेविका सौ.अश्विनी अमोल केंद्रे व समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी वारंवार शासन दरबारी केली आहे त्याचप्रमाणे मंत्री ना.अदित्य ठाकरे यांनी ऑगस्ट २०१९ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीसुद्धा केली होती. शिवसेनेच्या वचननाम्यातसुद्धा याबद्दल दुजोरा दिला होता मात्र २०२० ला ठाकरे सरकार राज्यात येऊन आजतागायत कोणत्याही प्रकारे हा वचननामा सत्यात उतरवताना दिसत नाही आहे.
या मागणीसाठी समाजसेविका सौ.अश्विनी अमोल केंद्रे व समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी विविध प्रकारे आंदोलन / उपोषण केले आहेत. गेले काही दिवस सौ.अश्विन अमोल केंद्रे यांनी आपल्या राहत्या घरात उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या कार्याला व लढ्याला लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारततर्फे पाठिंबा देण्यासाठी . लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत अशोकराव खानविलकर यांनी उपोषणस्थळी भेट देवून लोकस्वराज्य युनियन कडून जाहीर पाठिंबा दिला. तसेच त्यांनी हाती घेतलेल्या या लढ्यात त्यांना यश मिळावे, अशी सदिच्छाही व्यक्त केली.
राज्य राखीव पोलिस दलाच्या सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा विचार करून समाजसेविका सौ.अश्विनी अमोल केंद्रे व समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी सुरु केलेल्या या लढ्याला लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारतचा जाहीर पाठिंबा असल्याचे पत्रही त्यांनी यावेळी दिले. या पत्रावर राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत अशोकराव खानविलकर व ठाणे जिल्हा राष्ट्रीय अध्यक्ष सह तक्रार निवारण प्रमुख अनिकेत दत्तात्रेय शिंदे यांच्या स्वाक्षरी आहे.








