मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – सैराट फेम अभिनेत्री रिंकु राजगुरूने अल्पकालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. रिंकु सोशल मीडियाद्वावरे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आपले फोटो शेअर आपल्या चाहत्यांना नेहमीच भुरळ घालत असते. दरम्यान, तिने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खुपच सुंदर दिसत आहे.

रिंकु नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच तिने ब्ल्यू रंगाच्या आऊटफिट मधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खुप खुशदेखील दिसत आहे. मात्र तिने हे फोटो शेअर करताना, ”आनंद होण्यासाठी कोणत्या कारणाची गरज नसते.” असे म्हटले आहे.

काही दिवसापूर्वी रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊटचा फोटो शेअर केला होता. नेहमी जाड दिसणारी आर्ची शेअर केलेल्या फोटोत फिटनेसमध्ये दिसत आहे. सैराट चित्रपटात रिंकुने फिगर मेंनटेन या बी टाऊनच्या मंत्राला छेद देत काम केले होते. मात्र, आता रिंकुन फिगर मेंनटेनचा मंत्र समोर ठेवुन तब्बल २० किलो वजन घटविले आहे. विशेष म्हणजे तिने वजन घटविण्यासाठी कोणताही ट्रेनर ठेवला नाही. तिची ट्रेनर व डाएटिशियन म्हणून तिच्या आईनेच पाहिले. तिच्या आईनेच तिच्या खाण्यापिण्याची आणि तिच्या व्यायामाची काळजी घेतली. केवळ दोन महिन्यांत तिने तब्बल वीस किलो वजन घटवल्याचे रिंकूने म्हटले आहे.







