शत्रूंच्या छातीत धडकी, लष्करात ११८ ‘अर्जुन’ रणगाड्यांचा समावेश

Tank

दिल्ली – भारतात निर्माण करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘अर्जुन’ रणगाडे भारतीय सेनेकडे सुपूर्द करण्यात
आले. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. ११८ रणगाडे सेनेला देण्यात आले आहेत. यांची किंमत ८ हजार १०० कोटी रुपये असल्याची माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

हे रणगाडे भारतीय बनावटीचे आहेत. त्यांच्यावर अत्याधुनिक संपर्क यंत्रणा बसवण्यात आली आहे. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची या रणगाड्यांची क्षमता आहे. भारतातील इतर सर्व रणगाड्यांपेक्षा यांचा वेग अधिक आहे. रशियाच्या टी ७२ या रणगाड्यात अनेक सुधारणा करुन हे रणगाडे तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या रणगाड्याचे ७० टक्क्याहून अधिक भाग हे भारतीय बनावटीचे आहेत. याची निर्मिती तामिळनाडूतील डीआरडीओच्या संशोधन आणि उत्पादन केंद्रात करण्यात आली आहे.

अर्जुन 1 A ची प्रमुख वैशिष्टे

१. सतत हालचाल करणाऱ्या लक्षाला सुद्धा हा रणगाडा अचूकपणे भेदू शकतो.
२. भू-सुरुंग पेरलेल्या ठिकाणावरुन सुद्धा हा रणगाडा वाटचाल करु शकतो.
३. या रणगाड्यासमोर सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्रे आणि ग्रेनेड हल्ल्यांचा काहीही उपयोग होणार नाही.
४. या रणगाड्यांमध्ये केमिकल हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी विशिष्ठ प्रकारचे सेन्सर लावण्यात
आले आहेत.
५. पश्चिम राजस्थानमधील सैन्याच्या मदतीला हे रणगाडे असणार आहे.
६. या रणगाड्यांच्या टार्गेटमध्ये पाकिस्तान आहे. हे नक्की…
७. एक रणगाडा तयार करण्यासाठी ५४ कोटी रुपये खर्च आला आहे.
८. १२४ रणगाडे पूर्वीपासून सैन्याकडे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here