कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून केंद्राकडून कामाच्या ठिकाणी ‘हे नियम’ पाळायचे आदेश!

corona-case-high

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात शहरी भागांमध्ये पुन्हा एकदा बळावताना दिसत आहे. केंद्र शासनाने पुढे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवू नये, म्हणून ऑफिसेस साठी काही नियम घालून दिले आहेत. ते नियम काय आहेत जाणून घेऊयात: जर कामाच्या ठिकाणी मोठ्या संख्येत कोविड-19 प्रकरणे आढळून आल्यास संपूर्ण ब्लॉक किंवा इमारतीचे निर्जंतुकीकरण होईपर्यंत काम सुरू करू नये.

कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुपरवायझरना याची माहिती द्यावी. त्यानंतर पुढील सूचना मिळेपर्यंत ऑफिसमध्ये हजर राहू नये. अशा कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी.वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा वगळता कंटेन्मेंट झोनमधील सर्व ऑफिस बंद राहतील.कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या परिसरातील कर्मचाऱ्यांना प्रवेश द्यावा, दोन व्यक्तींमध्ये किमान 6 फूट अंतर ठेवणे तसेच मास्क वापरणे आवश्यक.

संबंधित व्यक्तींनी नाक आणि तोंड योग्यरित्या झाकले जाईल, अशा प्रकारचे मास्क वापरावेत. कमीतकमी 40 ते 60 सेकंद हात साबणाने स्वच्छ धुवावेत. जेथे शक्य असेल तेथे अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करावा. शक्य तेवढ्या मिटींग्ज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्याव्यात. जास्त संख्येत लोक जमतील अशा प्रकारचे कार्यक्रम टाळावेत.ऑफिसच्या प्रवेशद्वारांवरच सॅनिटायझर आणि थर्मल स्क्रीनिंग करणे अनिवार्य.ऑफिस दिवसातून कमीत कमी दोनवेळा स्वच्छ करावे.
लिफ्टमध्ये लोकांची संख्या मर्यादित ठेवावी वेंटिलेशनसाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. ऑफिसमधील एसीचे तापमान 24 ते 30 डिग्री सेल्सिअस दरम्यान ठेवावे. दरवाज्याची कडी, लिफ्टची बटणे, बेंच, वॉशरूम अशा ठिकाणी 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराइट वापरून साफसफाई करावे.

ऑफिसबाहेर गेल्यावरही दुकान, स्टॉल्स, कॅफे किंवा कॅन्टीन अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे.
कर्मचाऱ्यांनी त्यांचे तापमान नियमितपणे तपासावे, तसेच श्वसनासंबंधी लक्षणांची तपासणी करावी. फ्लूसारखी लक्षणे असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here