मुंबईकरांनो पेट्रोल,डिझेलचे दर वाढले..!

petrol

मुंबई – देशभर पेट्रोल,डिझेलच्या किंमती वाढत असताना मुंबईही मागे राहिलेले नाही. दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे.

लॉकडाउनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असल्याने महागाईत अधिक भर पडली आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत ९५.४६ रुपये इतकी आहे,

तसेच डिझेलचा दर ८६. ३४ प्रतिलिटर आहे. काल १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत पेट्रोलची किंमत ९५.२१ रुपये, तर डिझेलचा दर ८६. ०४ रुपये प्रतिलिटर होता. आता पेट्रोल, डिझेल शंभरी गाठते की काय, अशी भीती मुंबईकरांच्या मनात निर्माण झाली आहे. पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहता मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाढते दर परवडत नसल्याने गाडी घराबाहेर काढायची की नाही हा प्रश्न आता मुंबईकरांच्या मनात निर्माण झाला आहे. पेट्रोलचे दर वाढल्याने अनेक सामान्य जनतेंमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. तसेच आता पेट्रोल पंपवरील कमी गर्दीचे चित्रही पाहायला मिळते.

पेट्रोल डिझेल बरोबर गॅस सिलेंडरच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येते. गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये सुध्दा वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येते. साहजिकच याचाही मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. मुंबईत आज गॅस सिलीडरची किंमत ७१९ रुपये इतकी आहे. तसेच गेल्या महिन्यामध्ये गॅस सिलेंडरची किंमत ६९४ रुपये इतकी होती.

आज एक महिन्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये २५ रुपयाने वाढ झाल्याचे दिसून येते. वाढते पेट्रोल आणि डिझेलचे भाव त्याचबरोबर गॅस सिलेंडरचे वाढते दर हे सर्वसाधारण जनतेच्या मनात नाराजी निर्माण करत आहे. याचे सर्वात जास्त टेंशन हे गृहिणींना आले आहे. पेट्रोल, डिझेल ठीक होतं, पण आता गॅस सिलेंडरमध्येही बचत करावी लागणार की काय, असा मोठा प्रश्न गृहिणींसमोर उभा राहिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here