महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन?

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र आपल्याला करोनामुक्त होत असल्याचे दिसून येत होते. पण सध्या करोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षात राज्यामध्ये ३० नोंव्हेबर (२०२०) मध्ये रुग्णांची संख्या ३,८०० इतकी आढळून आली होती. त्याचप्रमाणे या (सोमवारी)१५ फेब्रुवारी २०२१ मध्ये करोना रुग्ण संख्या साडेतीन हजार एवढी आहे. म्हणजेच सलग अडीच महिन्यानंतर ३०० ने रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या सोमवारी १,८४२ रुग्ण नोंदवण्यात आले होते. परंतु फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्येची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या सोमवारी तर रुग्णवाढीने तीन हजाराचा टप्पा पार केला. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा lockdown होऊ शकेल, असा इशारा अजित पवार यांनी नागरिकांना दिला आहे.

दिलासादायक, बाब म्हणजे हळूहळू करोना रुग्णसंख्येमध्ये घट होत होती त्यामुळे नागरिकांमधें भीतीचे वातावरणही कमी झाले होते. पण येत्या काही दिवसात नागरिकांनी मास्क वापरण्याचे प्रमाण कमी दिसून येत आहे. तसेच रविवारी सुट्टी आसल्याकारणाने चाचण्या कमी होत असतात त्यामुळे इतर दिवसांपेक्षा रुग्णसंख्या कमी आढळते. जर रुग्ण संख्येमध्ये पुन्हा वाढ होत आसली तर पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. .

त्याचप्रमाणे ,चेंबूर या विभागात लोकसंख्या जास्त असल्याने पुन्हा करोनाचा कहर वाढत आहे. व तिथे रुग्णांचीही वाढ होताना आढळून येत आहे. मुंबईत (सोमवारी) १५ फेब्रुवारीला ४९३ नवीन रुगाणंची नोंद झाली तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे . चेंबूरमध्ये लोकांची वर्दळ जास्त होत असल्याने सोसायटी आणि फेरीवाल्याना करोना तपासणी करण्याचे सांगितले आहे. तसेच तिथल्या राहत्या रहिवाशना नोटीस पाठवून नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here