पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

मुंबई (प्रतिनिधी) – भाजपात एकजूट काही दिसून येत नाही. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सरळ वनमंत्री संजय राठोड यांचावर आरोप केला आहे. त्याच बरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानीसुद्धा मंत्र्याचे नाव न घेता आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या आत्महत्या प्रकरणात लक्ष द्यावे अशी विनंती केली आहे.

त्यानी विनंती करताना आपण महिलांचा आदर करतो त्यामुळे पूजा चव्हाण यांनाही तो मान मिळावा. आणि हे तुम्ही करू शकता. पोलिसांनी मोबाईलच्या मिळालेल्या माहिती सोबत लॅपटॉपसुद्धा बघावे. अजून चौकशी करावी. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विनंती करताना बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला आहे… बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांचा नेहमी आदर केला, म्हणून तुम्हीही यात लक्ष वेधून या आत्महत्या प्रकरणाला न्याय द्यावा. तरी अजून गुन्ह्याची सुई संजय राठोड यांच्यावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here