आता व्हाट्सॲप आणणार नवे फिचर; करता येणार लॉग आऊट!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – WaBetaInfo च्या माहितीनुसार व्हाट्सॲपमध्ये लॉग आऊट फिचर येणार आहे. आधी पासून या फिचरची मागणी केली जात होती. व्हाट्सॲप चोवीस तास ऍक्टिव्ह असते. त्यामुळे आपले वैयक्तिक आयुष्य पणाला लागते असे वाटते. या मधून थोडा वेळ आपल्या आयुष्यासाठी काढावा असे अनेकदा वाटते. आता तसे करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हाट्सॲप मधील आता डिलीट अकाऊंट हा पर्याय हटवण्यात येणार आहे. यासोबतच विविध फीचर्स व्हाट्सअँप आणेल. त्यापैकी एक व्हॅकेशन मोड! एखाद्या व्यक्तीच्या मेसेजेसना तुम्हाला वाचायचे नसेल तर तुम्ही त्या चॅट साठी व्हॅकेशन मोड लावू शकता. रीड लेटर म्हणून हे फिचर वापरू शकता. हा मोड बंद केल्यानंतरच तुम्ही एखाद्या चॅट चे मेसेजेस वाचाल!

व्हाट्सॲपच्या बीटा व्हर्जनमध्ये लॉग आउट चा पर्याय आला आहे. काही खास लोकांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर हे फिचर दिसत आहे. कंपनी यावर काम करत असून लवकरच हे फिचर अँड्रॉइड मोबाईल मध्ये येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here