- कोणता खेळाडू किती रुपयांना विकला गेला?
- फ्रॅंचाईजीच्या यादी मध्ये कोणत्या टीम उतरल्या आहेत.
चेन्नई – आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. चेन्नईत होणाऱ्या या लिलावात काही मोठ्या खेळाडूंसोबत देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या युवा खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते. यावर्षी लिलावात पंजाब किंग्ज संघाकडे सर्वाधिक रक्कम आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडे सर्वाधिक खेळाडूंच्या जागा शिल्लक आहेत. लिलावात २९२ खेळाडू असून त्यापैकी १६४ भारतीय तर १२५ परदेशी आहेत.
यामध्ये चेन्नई सुपर किंग्स 19.9 कोटी रुपये घेऊन उतरली आहे. तर मुंबई इंडियन्स कडे 15. 35 कोटी आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या टीमकडे 35.4 कोटी रुपये आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद ने 10.75 कोटी रुपये स्वतःजवळ ठेवले आहेत.दिल्ली कॅपिटल्स कडे 13.4 कोटी पंजाब कडे 53.2 कोटी राजस्थान रॉयल्स कडे 37.85 कोटी तर कोलकत्ता नाइट रायडर्स कडे 10.75 कोटी आहेत. अजूनही आयपीएलचे ऑक्शन चालू आहे. सध्या आपण जाणून घेणार आहोत, करोडोंच्या बोलीवर कोणत्या संघामध्ये कोणता खेळाडू गेला आहे.
स्टीव्ह स्मिथ या खेळाडूला दिल्ली कॅपिटल्स ने 2.2 कोटी देऊन खरेदी केले आहे.ग्लेन मॅक्सवेल हा खेळाडू, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कडून 14.25 कोटी ला खरेदी केला गेला आहे.शाकिब अल हसन याला कोलकत्ता नाइट रायडर्स ने 3.2 कोटीला खरेदी केले आहे.मोईन अली या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्जने 7 कोटी रुपये मोजून खरेदी केले आहे.
शिवम दुबे या खेळाडूला राजस्थान रॉयल्सने 4.4 कोटी रुपये दिले आहेत आणि आपल्याकडून खेळायची संधी दिली आहे. क्रिस मॉरिस या खेळाडूला राजस्थान रॉयल्सकडून 16.25 कोटी रुपये मिळाले आहेत. युवराज सिंगचा सोळा कोटी मध्ये विकल्या जाण्याचा रेकॉर्ड याने मोडला आहे. आदम मिलन याला मुंबई इंडियन्स ने 3.2 कोटी रुपये देऊन खरेदी केले असून, नाथन ला देखील मुंबई इंडियन्स ने 5 कोटी मध्ये खरेदी केले आहे.
रिचर्डसन पंजाब कडून खेळणार असून त्यासाठी 14 कोटी रुपये त्याने घेतले आहेत. पियुष चावला हा मुंबई इंडियन्स कडून 2.4 कोटी रुपयात खेळणार असून, उमेश यादव दिल्ली कॅपिटल्स कडून 1 कोटी रुपयांमध्ये खेळेल. सचिन बेबी हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कडून 20 लाखात खेळणार आहे तर राज्यात पाटीदार हा रॉयल चॅलेंजर्स कडूनच 20 लाखात खेळणार आहे. रिपल पटेल दिल्ली कॅपिटल्स कडून 20 लाखात खेळणार आहे तर शाहरुख खान हा पंजाब कडून 5.25 कोटी मध्ये खेळणार आहे. के गोथम चेन्नई सुपर किंग्स कडून 9.25 कोटी मध्ये तर विष्णू विनोद हा दिल्ली कॅपिटल्स कडून 20 लाखात खेळणार आहे.
शेल्डन जॅक्सन हा कोलकत्ता नाइट रायडर्स कडून 20 लाखात, मोहम्मद अजहरुद्दिन रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून 20 लाखात, लुकमन मेरीवाला दिल्ली कॅपिटल्स कडून 20 लाखात तर चेतन साक्रीया राजस्थान रॉयल्सकडून 1.2 कोटी मध्ये खेळेल.






