मुंबई (संपादक सुनिल पाटील) – मुंबईत २००५ साली आलेल्या प्रलंयकारी पावसाने अनेकांचे जीवन उध्वस्त केले. त्यानंतर मुंबई महानगर पालिकेला जाग आली आणि मुंबईतील नाल्याच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाची मोहिम हाती घेतली. आज २०२१ साल उजाडले तरी नाल्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम सुरुचं आहे. आत्तापर्यत या कामावर मुंबई महानगर पालिकेने जवळपास अडीच हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र नाल्यांच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाचे कोणतेही काम झालेले पाहायला मिळालेले नाही.
१७ वर्षापूर्वी या कामांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्याची किंमत ही १२०० कोटी रुपये होती. हे काम ब्रिमस्टोवॉड योजनेअंतर्गत होणार होते. आता या कामाच्या खर्चाने ४ हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. २००७ मध्ये ब्रिमस्टोवॉड प्रकल्पाचा खर्च १२०० कोटी रुपये इतका होता. हा प्रकल्प २०१२ ला पूर्ण होणे अपेक्षित
होते. २०१४ रोजी या प्रकल्पाची कालमर्यादा वाढवण्यात आली. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च सुद्धा वाढला. तो ३ हजार ५०० कोटी रुपये इतका असल्याचे पालिकेने सांगितले. आणि आता तो खर्च ४ हजार कोटींच्या घरात पोहचला आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करुन सुद्धा नाल्यांची स्थिती आहे तशीच आहे. मुंबईतील ज्या ४८ ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी साचते अशा ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे नविन टेंडर काढण्यात आले आहे. भाजपाचे
पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी याला विरोध दर्शवला आहे. आणि त्यांनी
ब्रिमस्टोवॉड प्रकल्पावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर पालिका प्रशासनाने उत्तर देताना आत्तापर्यत २ हजार ४३९ कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले. या खर्चातील १ हजार कोटी केंद्र सरकारने दिले आहेत. मुंबईत पाणी तुंबण्याची समस्या कधी संपणार आणि मुंबईकरांना या समस्येपासून कधी दिलासा मिळणार, यावर कोणताही पालिका अधिकारी बोलण्यास तयार नाही.
१९८५ साली मुंबईत पुर परिस्थिती निर्माण झाली होती. अशी परिस्थिती मुंबईत पुन्हा उद्भवू नये, यासाठी मुंबईतील नाले आणि नदीपात्राचे रुंदीकरण करण्यााची मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यासाठी १०० कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तो खर्च २००५ साली वाढून १२०० रुपये इतका झाला. केंद्र सरकारने या कामासाठी १२०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यातील १ हजार कोटी पालिकेला प्राप्त सुद्धा झाले. आता त्यातील २०० कोटी येणे बाकी आहे.
यासंदर्भात बुलंद पोलिस टाईम्स पालिकेला काही प्रश्न विचारत आहे.
१. नाल्यातून काढण्यात आलेला ४ हजार कोटी रुपयांचा कचरा कुठे टाकण्यात आला?
२. ४ हजार कोटी रुपयांचा कचरा कुठे गायब झाला?
३. ४ हजार कोटी रुपयांचा कचरा नाल्यातून कधी काढला गेला?






