संजय राठोड प्रगटले पोहरा देवीच्या चरणी; १४ दिवस होते नॉट रिचेबल

मुंबई (प्रतिनिधी) – पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडे राजकारण सुरु असल्याचे संजय राठोड यांनी सांगत, सोशल मिडीयाच्या माध्यमातून माझी बदनामी सुरु असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ते पोहरा देवीच्या दर्शनाला आले होते. मला बदनाम करण्याचे काम सुरु आहे. चौकशीतून सत्य समोर येईल, असं राठोड यांनी सांगितले आहे.

पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी १४ दिवस नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड हे आज नागपूरच्या पोहरादेवी चरणी प्रगट झाले. संजय राठोड हेच पूजा चव्हाण यांचे मारेकरी असल्याची प्रतिक्रीया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. आणि संजय राठोडच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत असे सांगितले आहे.

बिळातला नागोबा बाहेर आला, अशा शेलक्या शब्दात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी संजय राठोड यांच्यावर टिकास्त्र सोडलं. या प्रकरणीचा सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. पुजा चव्हाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे की नाही याची स्पष्टता अद्यापही नसल्याचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. आणि नक्की मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर नक्की काय सुरु आहे. असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.

बीडच्या परळी इथे राहणारी २२ वर्षाची पूजा चव्हाणचा पुण्यातील आपल्या राहत्या घरातून पडून ७ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. पूजा चव्हाण आणि वनमंत्री संजय राठोडचे नाव या प्रकरणात समोर येत आहे. त्या दोघांच्या १२ ऑडिया क्लिप समोर आल्या असल्या तरी सुद्धा राठोड यांना आपला गुन्हा कबूल नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here