वाशिम येथील होस्टेलमधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

मुंबई (कार्यालय प्रतिनिधि) – वाशिम येथील एक होस्टेलमधील विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांना करोनाची लगन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील आदिवासी निवासी शाळेतील चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतीगृहात राहणारे तब्बल २२९ विद्यार्थी दोन दिवसांत करोनाबाधित आढळून आले आहेत. .या शाळेतील विद्यार्थ्यांत करोनाची लक्षणे दिसून आल्यावर त्यांची तपासणी करण्यात अली.

या तपासणीत हे विद्यार्थी कोरोना पॉजिटिव आढळून आले. गेल्या ३ दिवसात २ कर्मचारी तसेच २२९ विद्यार्थी करोनाबाधित आढळून अले. त्यामुळे हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ११, अमरावतीतील १५१, यवतमाळ जिल्ह्यातील ५५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here