रेल्वेत मोफत वायफाय सेवा

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – मोबाइल हे आता माणसाचे जवळचे साधन बनले आहे. एक क्षणही मोबाईलशिवाय माणूस राहू शकत नाही. मोबाईलमधील इंटरनेट जर ५ मिनिट जरी बंद झाले तरी माणूस वेडापिसा होतो इतकी माणसाला मोबाईलची सवय लागली आहे.

मोबाइलचे अनेक तोटे जरी असले तरी त्याचे फ़ायदेहो अनेक आहेत. म्हणूनच दर महिन्याला पैसे खर्च करून तो डेटा पैक खरेदी करत असतो. या माणसाच्या सवईला आता रेल्वेने साथ द्यायचे ठरवले आहे. प्रवाशांसाठी रेल्वे आता मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देणार आहे.

मार्चअखेरीस मुंबई लोकलसह मेल-एक्स्प्रेसमध्ये ‘कंटेंट ऑन डिमांड’ अंतर्गत वायफाय सेवा पुरवण्याचा निर्णय ‘रेलटेल’ने घेतला आहे. यामुळे लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना मनोरंजनाचा अनुभव घेता येणे शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here