मुंबई (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या गाईडलाईन्समुळे व्हाट्सअप बंद पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. टेलिकॉम मिनिस्टर रविशंकर प्रसाद यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. त्यात सोशल मिडियासाठी गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या.
यात १० गाइडलाइन्स जारी केल्या असून यातील एक गाईडलाईन्समुळे व्हाट्सअप बंद पडण्याची भीति व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावर कोनाही व्यक्तिने मैसेज टाकला तर तो टाकणारा व्यक्ति कोण आहे याचा तपास त्या कंपनीने करायचा आहे. परंतु याला व्हाट्सअपचा नकार आहे. म्हणून या गाईडलाईन्समुळे व्हाट्सअप बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.






