गुवाहाटी (आसाम) – भारताची स्टार महिला धावपटू हिमा दास ही शुक्रवारी आसाम पोलिस दलात डीएसपी पदावर रुजू झाली. मैदान गाजवणारी हिमा दास पोलिस पोशाखात रुबाबदार दिसत होती. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिमाला डीएसपी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हिमाने आयएएएफच्या वर्ल्ड अंडर २०च्या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय धावपटू आहे. हिमाच्या नावावर ४०० मीटर स्पर्धेचा राष्ट्रीय विक्रम देखील आहे.
Welcome Aboard!
Heartiest Congratulations to @HimaDas8 and all 597 newly selected Sub Inspectors of Assam Police.
Together, we'll write a new saga of people friendly policing in the State, to serve the citizens of Assam.@CMOfficeAssam @DGPAssamPolice#SIsRecruitment pic.twitter.com/KBeFUGHLuW
— Assam Police (@assampolice) February 26, 2021
हिमाच्या डीएसपी पदावर नियुक्ती केल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी देखील हिमाचे अभिनंदन केले आहे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. शाळेत असल्यापासून माझी पोलिस दलात अधिकारी होण्याची इच्छा होती. माझ्या आईची देखील हीच इच्छा होती, असे तिने सांगितले.
पोलिस दलात दाखल झालो असलो तरी हिमाने धावपटू म्हणून करिअर सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. हिमाने २०१८च्या आशियाई स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याच बरोबर महिलांच्या ४०० मीटर रिलेच्या विजेत्या संघात ती होती.
I'm so happy that one of my biggest dreams came true today. I am proud to be the DSP, @assampolice .
It's an honour I will always wear with pride.
I would like to thank our CM @sarbanandsonwal sir, @himantabiswa sir and @KirenRijiju sir for their constant support.Contd..1/2 pic.twitter.com/ftgA16goqf
— Hima (mon jai) (@HimaDas8) February 26, 2021






