मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – देशात मागील काही काळापासून बेरोजगारीचा मुद्दा चर्चेचा आणि आव्हानाचा विषय ठरत आहे. एकिकडे प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या या राष्ट्रात बेरोजगारीचं वाढतं प्रमाण ही चिंताजनक बाब ठरत आहे. यावरच आता देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आपलं मत मांडत मोदी सरकारला निशाण्यावर घेतलं आहे.
मोदी सरकारवर तोफ डागत सिंह म्हणाले, २०१६ मध्ये कोणताही विचार न करता घेण्यात आलेला नोटाबंदीचा निर्णय पाहता त्याचमुळं देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. राज्य आणि तेथील स्थानिक प्रशासनांशी चर्चा न करण्याच्या केंद्राच्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
आर्थिक विषयांवर आधारित ‘थिंक टँक’ राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ डेवलपमेंट स्टडीजकडून डिजिटल माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एका विकास परिषदेच्या उदघाटन सोहळ्यासमयी त्यांनी आपले विचार मांडले.






