मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – ‘दिल तो बच्चा है जी’ या बॉलिवूडपटात आरजेची भूमिका साकारणारी आणि गालावर सुंदर खळी असणारी अभिनेत्री श्रध्दा दासचा आज ४ मार्च रोजी वाढदिवस आहे. सध्या ती लाईमलाईटपासून दूर असली तरी तिच्या फिटनेसमुळे ती चर्चेत राहते. श्रद्धाने मोजके चित्रपट केले आहेत. परंतु, तिने तेलुगु, हिंदी, मल्याळम, कन्नड आणि बंगाली चित्रपट केले आहेत.
श्रद्धा दासचा जन्म मुंबईत एका बंगाली कुटुंबात झाला. श्रद्धाचे वडील एक बिजनेसमॅन आणि आई गृहिणी आहे. तिने एसआयईएस कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. तिने पत्रकारितेत मास मीडियाची पदवी मुंबई विद्यापीठातून घेतली आहे.
तिने २००८ मध्ये तेलुगु चित्रपट सिद्दू फ्रॉम सिककुलममधून चित्रपट विश्वात डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने मुख्य भूमिका असणाऱ्या अभिनेत्रीची बहिणीची भूमिका साकारली होती. पहिल्या चित्रपटाला तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. पुढे तिने काही चांगले चित्रपट केले. यामध्ये २० लव्ह स्टोरी, डायरी, आर्या २ या चित्रपटांचा समावेश आहे.
तिने २०१० मध्ये हिंदी चित्रपट लाहोरमधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. भारत-पाकिस्तानच्या नात्यावर आधारित चित्रपट होता.२०१४ मध्ये श्रद्धाने बंगाली चित्रपट द रॉयल बंगाल टायगरमधून डेब्यू केला. गुंटूर टॉकिज, जिद, आर्या २, बाबूमोशाय बंदूकबाज, ग्रेट ग्रॅड मस्ती, डार्लिंग असे चित्रपट तिने केले.
तिने आपले हॉट फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे इन्स्टावर १.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांनी कमेंट दिली आहे. एका सोशल मीडिया युजरने लिहिले आहे – Am looking at the brighter side of your waist…






