जनमत प्रतिष्ठान, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान तसेच
अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे आयोजन
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जागतिक महिला दिनानिमित्त जनमत प्रतिष्ठान व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान तसेच अन्याय अत्याचार निर्मूलन समिती जळगावच्या वतीने हरिविठ्ठल भागातील भिलाटी वस्तीमध्ये महिला दिन सानिया तडवी या मुलीचा वाढदिवस साजरा करून तसेच भिलाटी वस्तीतील महिलांना साड्या वाटप लहान मुलांना फराळ वाटप ,मास्क वाटप करण्यात आले.
अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या सुचीत्राताई महाजन यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,, त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान चे अध्यक्ष दीपक भाऊ दाभाडे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या उपाध्यक्ष मनीषा पाटील, सहसचिव हर्षाली पाटील, रीना तडवी, कोटा क्लासचे संचालक संजय सिंग सर ,रोहन महाजन उपस्थित होते









