बुलंद पोलिस टाइम्सचे सर्वेसर्वा मुख्य संपादक सुनिल शिवदास पाटील यांचे अभीष्टचिंतन!

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – माणसाच्या अंगी जिद्द असली म्हणजे तो शून्यातूनही विश्व निर्माण करु शकतो. घरात पत्रकारितेची कोणतीही परंपरा नसताना पत्रकारितेच्या क्षेत्रात एक विश्व निर्माण करणे ही साधी गोष्ट नाही. सुनिल पाटील यांनी हे अशक्यप्राय असे पद प्राप्त करण्यासाठी आपली मेहनत, जिद्दीने वाटचाल केली आहे.

त्यांचा जन्म १० मार्च १९७६ रोजी जळगाव जिल्ह्यातील साकरे येथे झाला. त्यांचे बालपण पिंप्री बु।। येथे गेले. त्यांचे प्राथमिक तसेच पदवीपर्यंतचे शिक्षण धुळे – जळगाव येथे झाले. महाविद्यालयीन जीवनातच त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. या सामाजिक कार्यातूनच त्यांना राजकारणाची दारे उघडली गेली. त्यातूनच पिंप्री बु।। ग्रामपंचायतीचे सदस्यपद भूषविले. समाजकार्य व राजकारणातूनच सामान्यजनांच्या प्रश्नांची जाणिव होत असतांना, या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी १५ वर्षांपूर्वी पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि स्वतःचे साप्ताहिक सुरु केले. आठ वर्षांपूर्वी दुसरे साप्ताहिक दर्शन पोलिस टाइम्सची स्थापनाही केली.सहा वर्षांपूर्वी आगाज पोलिस टाइम्स या दैनिकाची तर चार वर्षांपूर्वी बुलंद पोलीस टाइम्स या साप्ताहिकाची मुहूर्तमेढ रोवली. या सर्व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे कार्य अविरतपणे सुरु ठेवले आहे.

आपल्या ४४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत. पिंप्री बु।। ग्रामपंचायतीचे सदस्य, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव – मुक्ताईनगरचे मुख्य कार्यवाह तसेच ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशनचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते कार्य पहात आहे. फक्त राजकारण, समाजकारक व सांस्कृतिक क्षेत्रातच नाही तर सिनेक्षेत्रातही त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचे मनःपूर्वक अभीष्टचिंतन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here