बुलंद पोलीस टाइम्सचे सर्वेसर्वा व मुख्य संपादक सुनील पाटील
यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा
मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – आपल्या सदाबहार कॉमेडीने सर्वांचे मनोरंजन करणारे हास्यअभिनेता सुनिल पाल यांनी आज (दि.१० मार्च) बुलंद पोलिस टाइम्सच्या मुंबई कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. बुलंद पोलिस टाइम्सचे सर्वेसर्वा सुनिल शिवदास पाटील यांचा जन्मदिवस असल्याने, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते आज कार्यालयात आले होते.
सुनील पाल यांनी २००५ मध्ये ग्रेट इंडियन लाफ्टर शो जिंकल्यानंतर स्टॅण्डअप कॉमेडीसह त्यांनी चित्रपटातून भूमिका करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी ५१ शोमध्ये स्टॅण्डअप कॉमेडी केली आहे. त्यांच्या उपस्थितीने मुख्य संपादक सुनिल पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला रंगत आली.
बुलंद पोलीस टाइम्सचे सर्वेसर्वा आणि मुख्य संपादक सुनील शिवदास पाटील यांचा ४४वा वाढदिवस आज धुमधडाक्यात पार पडला. बुलंद पोलीस टाइम्सच्या मौर्या हाऊस, ओशिवरा, अंधेरी येथील बुलंद पोलीस टाइम्सच्या मुख्य कार्यालयात बुलंद पोलीस टाइम्सचे कर्मचारी, अनेक मित्रमंडळी, सिने कलाकारांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला.
या वाढदिवस कार्यक्रमात विशेष लक्ष वेधून घेतले ते ग्रेट कॅमेडिअन सुनील पाल यांनी. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी विनोदाची पखरण करून या वाढदिवस कार्यक्रमाला रंगात आणली आणि सर्व उपस्थित मित्रमंडळी वृन्दाना आनंद दिला. तसेच त्यांनी आपल्या विनोदी शैलीत हसत राहा आणि हसवत राहा, असा संदेश देतानाच बुलंद पोलीस टाइम्सच्या नव्या ओटीपी प्लॅटफॉर्म एमएस १९ च्या आगमनाचीही बातमी दिली. या नवीन समाजमाध्यमाद्वारे मनोरंजन आणि निखळ मनोरंजन मिळण्याची ग्वाहीही दिली.








